शेलोडीत विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा
खामगाव : तालुक्यातील शेलोडी येथे २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २८ जुलै रोजी घडली. सासरकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी दिल्यानंतर खामगाव ग्रामीण पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि दीर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचे नाव वैष्णवी अनंता वडोदे…
