रस्त्यावर पडलेल्या विद्युत तारांचा शेतकऱ्याला जबर धक्का; ४० वर्षीय सुभाष जाधव यांचा मृत्यू
संग्रामपूर : शेतात जाण्याच्या रोजच्या प्रवासात रस्त्यावर मृत्यू दबा धरून बसला असेल, याची कल्पनाही सावळा येथील शेतकरी सुभाष रामकृष्ण जाधव यांना नव्हती. झाडाची फांदी तुटून विद्युत तारांवर पडल्याने वीजप्रवाह सुरू असलेली तार रस्त्याच्या मधोमध पडली होती. याच तारेला दुचाकीवरून जाताना स्पर्श झाल्याने ४० वर्षीय सुभाष जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेले सारंगधर…
