Headlines

बकरीच्या पैशांवरून हत्या; पाडळी शिंदेत व्यक्तीचा खून; मृताच्या मुलीचा शेजारील व्यक्तीवर संशय

देऊळगाव राजा : तालुक्यातील पाडळी शिंदे येथे बकरीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा डोक्यात कठीण वस्तूने वार करून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या खळबळजनक घटनेत मृत महेंद्र तुकाराम मोरे यांच्या मुलीने अंडेरा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार देत शेजारील व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे….

Read More

कुऱ्हाडीच्या हल्ल्यात वृद्ध मजूर गंभीर जखमी, बकऱ्यांसाठी पाला आणताना जीवघेणा हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

देऊळगाव राजा : तालुक्यातील सिनगाव जहागीर येथे बकऱ्यांसाठी पाला आणण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय वृद्ध मजुरावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात वृद्धाच्या डोक्याला व पाठीवर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

हॉटेलमध्ये दलित व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ; मारहाण प्रकरणी ॲट्रॉसिटीसह गंभीर गुन्हा दाखल

देऊळगाव राजा : शहरातील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या दलित समाजातील व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करत लाकडी दांड्याने मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल केला असून, घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

साखरपुड्यानंतर दिला विश्वासघात; लग्नाचे आश्वासन देऊन संबंध, व्यापाऱ्यावर गुन्हा

देऊळगाव राजा : लग्नाचे आश्वासन देत साखरपुडा करून एका पीडित महिलेशी चार वर्षे शारीरिक संबंध ठेवल्यानंतर दुसऱ्याच युवतीशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा येथील एका व्यापारी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील एका ४० वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या…

Read More

उसनवारीचे ४० हजार रुपये मागणे पडले महाग; शेतकऱ्यावर दगडाने हल्ला

देऊळगाव राजा : उसणे दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दगडाने हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना गिरोली बु. येथे घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल साहेबराव चव्हाण (वय ३४, रा. गिरोली बु., ह.मु. साईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून…

Read More

देऊळगावमही येथे प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

देऊळगावराजा :- अन्न व औषध प्रशासन विभागाने देऊळगावमही येथे धडक कारवाई करत प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे (वय 25, अन्न व औषध प्रशासन,…

Read More

मंदिर परिसरात साफसफाई करताना सर्पदंश; वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू, देऊळगावराजा तालुक्यातील घटना!

देऊळगाव राजा :- तालुक्यातील आळंद फाटा येथे गणपती मंदिर परिसरात स्वच्छता करत असताना सर्पदंश झाल्याने ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ज्ञानदेव मुक्ताराम जाधव (रा. मेहुनाराजा) हे रविवारी सकाळी मंदिर परिसरात साफसफाईचे काम करत होते. सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक त्यांच्या हाताला सापाने दंश केला….

Read More

जुन्या वादातून तरुणावर धारदार वस्तूने हल्ला; देऊळगावमहीतील चौघांविरुद्ध गुन्हा

देऊळगावराजा : तालुक्यातील देऊळगावमही येथे जुन्या वादाच्या कारणावरून २४ वर्षीय तरुणावर धारदार वस्तूने हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगावराजा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी क्षेयश उर्फ दीप सुरेश पडघान (वय २४, रा. देऊळगावमही) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ मे रोजी रात्री साडेआठच्या…

Read More

दगडवाडीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; गावात शोककळा

देऊळगाव राजा : तालुक्यातील दगडवाडी येथे २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. गुरुवारी सकाळी ही घटना समोर आल्यानंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव विशाल अजाबराव जायभाये (वय २५, रा. दगडवाडी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास विशाल…

Read More

जबरी चोरी प्रकरण उघड; तिघांना अटक, ५.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त!

देऊळगाव राजा :- तालुक्यातील बायगाव बु. येथे झालेल्या जबरी चोरीप्रकरणी पोलिसांनी वेगवान कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या चोरीत सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती व…

Read More
error: Content is protected !!