चोरीच्या मालासह तिघे जेरबंद; ३.९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत मलकापूर शहर डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई; विविध चोरीच्या गुन्ह्यांची उकल
मलकापूर : शहरात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मलकापूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने धडाकेबाज कारवाई करत विविध चोरीच्या गुन्ह्यांतील ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीत अनेक चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कारवाईमुळे शहरातील चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले…
