Headlines

चिखलीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; सहा ठिकाणी घरफोडी; चार संशयित सीसीटीव्हीत कैद; श्वानपथक व न्यायवैद्यकीय पथकाकडून तपास

चिखली : शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. शाहूनगर आणि पंचमुखी महादेव मंदिर परिसरात रविवारी (१४ सप्टेंबर) मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीने तब्बल सहा ठिकाणी घरफोडी करत रोकड व सोन्याचे दागिने लंपास केले. तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात हत्यारे असलेले चार संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. चोरट्यांनी इंगळे सर, अनिल सोनुने, संजय अंभोरे,…

Read More

चिखलीत सराईत गुन्हेगार पिस्तुलासह जेरबंद

चिखली : शहरात रात्रीच्या वेळी गस्त घालत असलेल्या चिखली पोलिसांच्या डी. बी. पथकाने एका सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्तुलासह रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. संभाजी नगर परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले असून, आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ ऑगस्टच्या रात्री चिखली पोलीस…

Read More

रामनगरात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड लंपास

चिखली तालुक्यातील रामनगर येथे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घरमालक नातेवाइकांकडे गेले असताना ही चोरी झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अंढेरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रामनगर येथील रामदास दिगंबर भगत हे ६ ऑगस्ट रोजी…

Read More

शौचालयासाठी गेलेल्या दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार; चिखली तालुक्यात खळबळ

चिखली : दिव्यांगत्वाचा गैरफायदा घेत २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बोरगाव वसु येथे उघडकीस आली आहे. ५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी चिखली पोलिसांनी सवणा येथील ३५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव वसु येथील स्मशानभूमीच्या पाठीमागे असलेल्या नाल्याजवळ पीडित तरुणी शौचासाठी गेली होती. यावेळी आरोपीने…

Read More

शिक्षिकेचा पाठलाग करणारा ‘रोड रोमिओ’ शिक्षक निलंबित, जिल्हा परिषद प्रशासनाची तातडीने कारवाई

चिखली : शहरातील ३८ वर्षीय महिला शिक्षिकेचा पाठलाग करून त्यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरणे आणि वैयक्तिक मोबाईल क्रमांक मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अकील अहमद अब्दुल रशीद, रा. चिखली, असे निलंबित शिक्षकाचे नाव असून, या कारवाईमुळे शिक्षिकेचा पाठलाग करणाऱ्या ‘रोड रोमिओ’ वृत्तीला चाप बसणार का, असा…

Read More

शाळेत जात असलेल्या शिक्षिकेला अडवून, ‘तुम्ही मला खूप आवडता, मला तुमच्याशी बोलायचे आहे,’ असे म्हणत मोबाईल क्रमांकची मागणी; तरुणावर गुन्हा

चिखली : शाळेत जाणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा आग्रह धरत मोबाईल क्रमांक मागितल्याचा प्रकार चिखली शहरात समोर आला आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या शिक्षिकेने चिखली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ८.४५ ते ८.५० वाजताच्या दरम्यान एका…

Read More

निर्माणाधीन इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू; फ्लॅट पाहणीदरम्यान घडली दुर्घटना

  चिखली : शहरातील शाहूनगर परिसरात निर्माणाधीन इमारतीतील फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेलेल्या ४७ वर्षीय महिलेचा वरून खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. २५) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत महिलेचे नाव वर्षा गुलाबराव चेके (वय ४७, रा. शाहूनगर, चिखली) असे…

Read More

स्वप्नांना बळ देणाऱ्या शहरातच रुग्णसेवेची नवी भरारी! डॉ. तुषार गोंधणे यांची दर गुरुवारी निःशुल्क त्वचारोग तपासणी सेवा

चिखली :- “ज्या मातीत स्वप्नांना आकार मिळाला, त्या मातीत समाजसेवेचे ऋण फेडणे हीच खरी कृतज्ञता,” या भावनेतून त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी चिखली शहरात दर गुरुवारी निःशुल्क रुग्णसेवा सुरू केली आहे. आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये त्वचा,…

Read More

२४ तासांत मोटारसायकल चोरीचा छडा; आरोपी गजाआड चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४८ हजारांची दुचाकी ज

चिखली :- बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने आरोपीला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे ४८ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरखेर्डा येथील सुभाष पांडुरंग सुसते यांनी त्यांच्या मालकीची हीरो…

Read More

शेतजमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग; पाच जणांविरुद्ध गुन्हा

चिखली : देवनगर शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग करत मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिबी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. सुमन विजय पवार या आपल्या भावाच्या मालकीच्या गट क्रमांक ३६ मधील शेती कसत आहेत. ५ मे…

Read More
error: Content is protected !!