राजूरजवळ कार-दुचाकीची समोरासमोर धडक; दोघे गंभीर, एअरबॅग्जमुळे कारमधील चौघे बचावले!
मोताळा : मलकापूर-मोताळा मार्गावरील धोकादायक वळण पुन्हा एकदा अपघाताचे कारण ठरले. राजूरजवळ भरधाव कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला, तर कारचेही मोठे नुकसान झाले. मात्र, अपघातावेळी कारमधील एअरबॅग्ज तत्काळ उघडल्याने दोन महिलांसह कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना मंगळवार,…
