मनार्डी फाट्याजवळ दुचाकी अपघात; वडगाव वान येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

वडगाव वान : वरवट बकाल–शेगाव मार्गावरील मनार्डी फाट्याजवळ झालेल्या दुचाकी अपघातात वडगाव वान येथील एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
मृत युवकाचे नाव संतोष ओमप्रकाश सोनी असे आहे. शनिवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मनार्डी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या संतोष सोनी यांना तातडीने वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलविले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
संतोष सोनी यांच्या अकाली निधनामुळे वडगाव वान परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!