चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकची दुचाकीला धडक; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मेहकर येथील घटना
मेहकर : कामानिमित्त दुचाकीने मेहकरकडे निघालेल्या २३ वर्षीय तरुणाच्या प्रवासाचा देऊळगाव माळी फाट्यानजीक झालेल्या अपघाताने दुर्दैवी अंत झाला. चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सोमवारी (दि. १४) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. निशीन प्रकाश कापरे (वय २३, रा. देऊळगाव…
