Headlines

सुटाळा खुर्दमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी, दोन दुचाकीही लंपास

खामगाव : सणासुदीच्या काळात बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर आली असून, सुटाळा खुर्द परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी घरांचे टाळे आणि कडी-कोंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच दोन मोटारसायकली चोरून नेण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ३१ ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या या घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण २ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल…

Read More

दोघांचा मृत्यू अन् कारमध्ये सापडला २६ किलो गांजा; खामगावात खळबळ!

खामगाव : नागपूरच्या दिशेने निघालेल्या एका कारचा टेंभूर्णा बायपास उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आणि या दुर्घटनेत कारमधील दोघांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, अपघातानंतर पोलिसांनी कारची झडती घेतली असता तब्बल १३ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा २६ किलो ६७० ग्रॅम गांजा आढळून आल्याने या घटनेला वेगळेच वळण मिळाले. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजताच्या…

Read More

तुरीच्या पिकातील तण नष्ट करण्यासाठी फवारणी; उपचारादरम्यान अकोला येथे सोडला प्राण

खामगाव : शेतीतील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधांची फवारणी करतात. मात्र, याच फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याने एका २७ वर्षीय शेतकरी पुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तुरीच्या पिकातील तण नष्ट करण्यासाठी तणनाशकाची फवारणी करताना अस्वस्थ वाटू लागलेल्या तरुणावर खामगाव आणि अकोला येथे उपचार करण्यात आले. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर…

Read More

गर्भलिंग तपासणीच्या आरोपानंतर अरबट सोनोग्राफी सेंटरची चौकशी; कामकाजात आढळल्या त्रुटी, सोनोग्राफी मशीन सील

खामगाव:- येथील अरबट सोनोग्राफी व एक्स-रे सेंटरमध्ये गर्भलिंग तपासणी करून स्त्रीभ्रूणहत्या केली जात असल्याचा आरोप करत सेंटरच्या माजी कंपाऊंडरने केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने चौकशी केली. जिल्हास्तरीय चौकशी समितीने केलेल्या तपासणीत सेंटरच्या कामकाजात विविध त्रुटी आढळून आल्याने २ ऑक्टोबर रोजी जिल्हा सल्लागार समितीच्या निर्णयानंतर पीसीपीएनडीटी पथकाने सोनोग्राफी मशीन सील केली. याबाबत जिल्हा चौकशी समितीचे प्रमुख डॉ. सुशीर…

Read More

मिरवणुकीत पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष; १० ते १२ जणांवर गुन्हा, खामगाव येथील घटना

खामगाव : मिरवणुकीदरम्यान ठरवून दिलेल्या मार्गाचे उल्लंघन करीत हुल्लडबाजी केल्याचा तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी १० ते १२ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मिरवणुकीदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. २५ सप्टेंबर रोजी रात्री १२ ते १२.३०…

Read More

मेंढ्या-बकऱ्या चारण्यावरून दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल, खामगाव येथील घटना

खामगाव : एमएसईबीजवळील पडीत जागेत मेंढ्या व बकऱ्या चारण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना २८ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात शेख सोहील शेख शब्बीर…

Read More

मंडळ अधिकाऱ्यास धक्काबुक्की; दीड ब्रास रेतीही लंपास, शासकीय पाहणीदरम्यान संभापूर येथील प्रकार; तिघांविरुद्ध गुन्हा

खामगाव : शासकीय कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की करीत त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याचा प्रकार संभापूर येथे सोमवारी घडला. यावेळी अवैध उत्खनन केलेली अंदाजे दीड ब्रास रेतीही संबंधितांनी घेऊन गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. मंडळ अधिकारी आत्माराम तोताराम इतवारे (४८) यांनी याबाबत…

Read More

राशन आणण्यासाठी घराबाहेर पडणे पडले महागात; घरातून ५८ हजारांचा ऐवज चोरीला

खामगाव : राशन आणण्यासाठी काही वेळ घराबाहेर गेलेल्या महिलेचे घर चोरट्याने हेरले. दरवाजा उघडा असल्याची संधी साधून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी चिंचपूर येथे उघडकीस आली. चिंचपूर येथील वैशाली देशमुख (वय ५५) या राशन आणण्यासाठी घराबाहेर गेल्या…

Read More

शेतीच्या धुऱ्याच्या वादातून दोन गट आमनेसामने; दगडफेकीत दोघे जखमी, खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव : शेतीच्या धुऱ्याच्या जुन्या वादाला पुन्हा तोंड फुटल्याने पारखेड येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यावेळी एकमेकांवर दगडाने हल्ला केल्याने दोन्ही बाजूंचे दोघे जखमी झाले. ही घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. आशा बळीराम डोबे (३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भानुदास…

Read More

भरधाव बसची दुचाकीला जोरदार धडक; ४४ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; शेगाव ग्रामीण पोलिसांकडून बसचालकाला अटक; न्यायालयीन कोठडी

खामगाव : खामगाव-शेगाव मार्गावर भरधाव खासगी बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री घडली. लासुरा शिवारातील अन्नकुटीजवळ झालेल्या या अपघातामुळे मार्गावर काही काळ खळबळ उडाली. अपघातानंतर शेगाव ग्रामीण पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण वासुदेव गाळे (२६, रा. खार तळेगाव, ता….

Read More