Headlines

घराचा दरवाजा तोडून घुसले; तोडफोडीसह महिलेचा विनयभंग जुन्या वादातून कुटुंबावर हल्ला; १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा

बुलढाणा : जुन्या वादाची धुसफूस मनात ठेवून १० ते १२ जणांच्या टोळक्याने एका कुटुंबाच्या घरावर धडक देत आधी घरासमोरील दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर दरवाजा तोडून घरात घुसत कुटुंबीयांना शिवीगाळ, मारहाण व धक्काबुक्की करण्यात आली. याच गोंधळात एका महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कारंजा चौक परिसरातील तिरुपती मंगल कार्यालयासमोर ८ सप्टेंबर…

Read More

मंदिरातील किरकोळ वादातून तलवारीचा धाक; नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, बुलढाणा येथील घटना

बुलढाणा : देवीच्या आरतीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाने पुढे गंभीर स्वरूप धारण केल्याने बुलढाणा शहरातील कारंजा चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपचे नगरसेवक आकाश दळवी यांना तलवारीसह लोखंडी रॉड आणि बंदुकीसारखे शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नगरसेवकांच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान,…

Read More

शौचालयाच्या खिडकीतून उडी मारून फरार; सराईत आरोपी ६ तासांत भुसावळहून जेरबंद

बुलढाणाः जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पहाटेच्या सुमारास शौचालयाच्या खिडकीतून उडी मारून पोलीस कोठडीतून पलायन केल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या सहा तासांत फरार आरोपीचा माग काढत त्याला जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून जेरबंद केले. आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतले…

Read More

नापिकी आणि कर्जाच्या विवंचनेत अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

बुलढाणा : सततची नापिकी, डोक्यावर वाढत जाणारे कर्ज आणि आर्थिक अडचणींच्या विवंचनेत जामठी येथील ३९ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले. शरद नारायण तायडे यांनी २२ ऑगस्ट रोजी शेतात विषारी औषध प्राशन केले होते. उपचारादरम्यान २३ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. जामठी येथील शरद नारायण तायडे यांच्याकडे तीन एकर शेती असून,…

Read More

सुलतानपूरकडे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ऑटोला भीषण अपघात; ७० वर्षीय भाविकाचा जागीच मृत्यू

सुलतानपूर : श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी सुलतानपूरकडे निघालेल्या भाविकांच्या ऑटो रिक्षाचा शुक्रवारी सुलतानपूर-भानापूर मार्गावर भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो रस्त्यालगतच्या विद्युत खांबावर आदळला. या दुर्घटनेत उदनापूर येथील भगवान शामराव मुळे (वय ७०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर ऑटोमधील अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे…

Read More

जिल्ह्याच्या मातीतील कर्तृत्वाचा मराठवाड्यात गौरव! डॉ. तुषार गोंधणे यांना ‘मराठवाडा गौरव – २०२६’ पुरस्काराने सन्मानित त्वचारोग रुग्णसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; विधान परिषद सभापती राम शिंदे व मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते गौरव

बुलढाणा : बुलढाण्याच्या मातीत रुजलेले कर्तृत्व जेव्हा मराठवाड्याच्या व्यासपीठावर सन्मानित होते, तेव्हा तो गौरव केवळ एका व्यक्तीचा राहत नाही, तर संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा ठरतो. रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत त्वचारोग उपचार क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य करणारे बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. तुषार गोंधणे यांना प्रतिष्ठेच्या ‘मराठवाडा गौरव – २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले….

Read More

काजूकतलीच्या डब्यात बुरशीसह जिवंत अळ्या! बुलढाण्यात एफडीएची रिलायन्स मॉलवर धडक

बुलढाणा : सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरात समोर आला आहे. रिलायन्स मॉलमधून खरेदी केलेल्या प्रसिद्ध सीताश्री-लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजूकतलीच्या डब्यात बुरशीसोबत चक्क जिवंत अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर एफडीएच्या पथकाने रिलायन्स मॉलवर धडक देत संबंधित मिठाईच्या साठ्याची तपासणी…

Read More

काजूकतलीच्या डब्यात बुरशीसह जिवंत अळ्या! बुलढाण्यात एफडीएची रिलायन्स मॉलवर धडक

बुलढाणा : सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरात समोर आला आहे. रिलायन्स मॉलमधून खरेदी केलेल्या प्रसिद्ध सीताश्री-लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजूकतलीच्या डब्यात बुरशीसोबत चक्क जिवंत अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर एफडीएच्या पथकाने रिलायन्स मॉलवर धडक देत संबंधित मिठाईच्या साठ्याची तपासणी…

Read More

वाकोडी फाटा – बोदवड रोड पुलापर्यंत दोन्ही बाजूंनी नाली बांधकामासाठी भरीव निधीची मागणी

मलकापूर : वाकोडी फाटा ते बोदवड रोडवरील पुलापर्यंत दोन्ही बाजूंनी पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा आणि भविष्यात पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी नाली बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखाली वाकोडी ग्रामपंचायत सदस्य पराहुल राजपूत व सामाजिक कार्यकर्ते किरण फिरके यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची…

Read More

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

बुलढाणा : पुणे येथील आयटी कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या ३२ वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील आरती शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा विवाह २२ मे २०२२ रोजी पुणे येथील करण शेळके याच्यासोबत झाला. लग्नावेळी पतीला रोख रक्कम, सोन्याची अंगठी…

Read More
error: Content is protected !!