शेतात गेलेल्या १३ वर्षीय मुलीवर अस्वलाचा हल्ला; गंभीर जखमी अवस्थेत अकोल्यात उपचार सुरू, जळगाव जामोद तालुक्यातील घटना
आसलगाव : सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर असताना शेतात गेलेल्या १३ वर्षीय मुलीवर भरदिवसा अस्वलाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा बीट क्रमांक दोन येथे घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिला बेशुद्ध अवस्थेत शेत परिसरातून बाहेर काढून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिंगारा येथील गायत्री…
