तुरीच्या पिकातील तण नष्ट करण्यासाठी फवारणी; उपचारादरम्यान अकोला येथे सोडला प्राण
खामगाव : शेतीतील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधांची फवारणी करतात. मात्र, याच फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याने एका २७ वर्षीय शेतकरी पुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तुरीच्या पिकातील तण नष्ट करण्यासाठी तणनाशकाची फवारणी करताना अस्वस्थ वाटू लागलेल्या तरुणावर खामगाव आणि अकोला येथे उपचार करण्यात आले. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर…
