कंपनीतील केमिकलयुक्त पाण्याने मलकापूर येथील युवकाचा मृत्यू; दसरखेड येथील घटना
मलकापूर : दसरखेड येथील बँजो केमिकल कंपनीत काम करीत असताना केमिकलयुक्त वेस्टेज पाणी अंगावर व तोंडावर उडाल्याने गंभीर जखमी झालेल्या ३३ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ललित वाघ, रा. मलकापूर असे मृत युवकाचे नाव असून, ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ललित वाघ हे दसरखेड येथील बँजो केमिकल कंपनीमध्ये काम करीत…
