जुन्या वादाची ठिणगी; तरुणाच्या पोटात चाकू खुपसला, देऊळगाव राजातील माळीपुरा परिसरातील घटना; जालना येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू
देऊळगाव राजा : जुन्या भांडणाची धुसफूस पुन्हा उफाळून आल्याने माळीपुरा परिसरात दोन तरुणांमध्ये झालेल्या वादाला…
देऊळगाव राजा : जुन्या भांडणाची धुसफूस पुन्हा उफाळून आल्याने माळीपुरा परिसरात दोन तरुणांमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. यावेळी चाकूने केलेल्या हल्ल्यात सोमेश प्रणयकांत डांगे (वय २८, रा. माळीपुरा) यांच्या पोटावर वार करण्यात आल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. गंभीर जखमी झालेल्या सोमेश यांच्यावर जालना येथील कलावती हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या…
मोताळा : तालुक्यातील सांगळद शिवारातून जाणाऱ्या नळगंगा धरणाच्या पात्रात ३६ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. ही घटना रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. हर्षपाल उर्फ छोटू आनंदा खराटे (वय ३६, रा. पिंप्री गवळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सांगळद शिवारातील नळगंगा धरणाच्या पात्रात रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिक कृष्णा चव्हाण…
अनुराबाद (ता. मलकापूर) : सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत एवोनिथ स्टील यांच्या वतीने अनुराबाद येथील मराठी शाळेत दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आरोग्य शिबिरात अनुराबाद, पान्हेरा, तांदुळवाडी, हरसोडा आणि धोंगर्डी येथील तब्बल २८० नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये…
मलकापूर :- सेवा संकल्प अभियान व ‘नमो सेवा गाथा’ कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, भालेगाव रण येथील विद्यार्थ्यांनी ‘जागर शासकीय योजनांचा, विकास जनसामान्यांचा’ या विषयावरील पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण केले. २ ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या आवारात तसेच तहसील चौकात विद्यार्थ्यांनी मनोरंजक पद्धतीने विविध शासकीय योजनांची माहिती देत जनजागृती केली. पथनाट्यातून केंद्र शासन तसेच राज्य…
शेगाव : अल्पवयीन मुलीला वारंवार मोबाईल संदेश पाठवून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाविरुद्ध पॉस्कोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दहावीचे शिक्षण सुरू असताना संबंधित तरुणाकडून होत असलेल्या त्रासाकडे सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या मुलीने त्रास वाढल्यानंतर अखेर पोलिसांत धाव घेतली. ही घटना शेगाव शहरातील जगदंबा चौक परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या…
मेरा बु. : पुण्याहून हिवरखेडकडे दुचाकीने परतणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा अंढेरा घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर तरुण गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावला. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते २.३० वाजेदरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गणेश रामचवरे (वय…
शेगाव : नागझरी रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत ५४ वर्षीय दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुरलीधर आनंदा काठोळे (वय अंदाजे ५४, रा. गणेशनगर, माळीपुरा, शेगाव) असे मृतकाचे नाव असून, ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. मुरलीधर काठोळे हे १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजेदरम्यान मोटारसायकलने शेताकडे जात होते. नागझरी रोडवरील…
मोताळा : तालुक्यातील लोणघाट शिवारात विनापरवाना मुरुमाचे उत्खनन करून त्याची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आल्याने महसूल प्रशासनाने कारवाई केली. कारवाईदरम्यान पंचनामा सुरू असतानाच संबंधितांनी वाहनांसह घटनास्थळावरून पळ काढल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात जेसीबी चालकासह ट्रॅक्टरवरील दोन इसमांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. धामणगाव देशमुख येथील तलाठी मंगला नामदेव कुकडे यांना २९…
मलकापूर : कोलते महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे ७० हजार रुपये किमतीची बुलेट अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोताळा तालुक्यातील लिहा बु. येथील विद्यार्थी संस्कार ईश्वर पाटील (वय १८) हा ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कोलते महाविद्यालयात…
मोताळा : बसस्टँडच्या पाठीमागील पडीत जमिनीत चरत असलेल्या मेंढ्या-बकऱ्यांच्या कळपातून अज्ञात दोन इसमांनी २५ हजार रुपये किमतीचा बोकड जबरीने उचलून दुचाकीवरून पसार झाल्याची घटना मोताळ्यात घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वारुळी येथील मेंढपाळ विजय दगडू बिचकुले (वय ३३) यांच्या मेंढ्या व बकऱ्या मोताळा बसस्टँडच्या पाठीमागील पडीत जमिनीत चरत होत्या….