Headlines

अंढेरा घाटात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

मेरा बु. : पुण्याहून हिवरखेडकडे दुचाकीने परतणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा अंढेरा घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर तरुण गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावला. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते २.३० वाजेदरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गणेश रामचवरे (वय…

Read More

मेरा बु. : दोन मुलांना काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

मेरा बु. : वाघूळ येथे दोन मुलांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी घडली असून, उपचारानंतर २७ सप्टेंबर रोजी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघूळ येथील मंदा अशोक बर्डे (वय ३५) यांच्या मुलांना योगेश बर्डे आणि गणेश बर्डे यांना…

Read More

नागणगाव टी-पॉईंटवर तरुणाला अडवून बेदम मारहाण दगडाने मारल्याचा आरोप; पाच जणांविरुद्ध अंढेरा पोलिसांत गुन्हा

मेरा बु. : कामानिमित्त दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नागणगाव टी-पॉईंट, खैरव येथे १८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी अंढेरा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर नंदाजी सोसे (वय ३१, रा. खैरव) हे…

Read More

अपंग तरुणीवर शेतात नेऊन अत्याचार; जीवे मारण्याची धमकी, आरोपीविरुद्ध गुन्हा

मेरा बु. : शौचासाठी शेतात गेलेल्या २१ वर्षीय अपंग तरुणीला जबरदस्तीने शेतातील नाल्यात ओढून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेने विरोध केल्यानंतर ही बाब कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित २१…

Read More

विहिरीत आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह; आत्महत्या की घातपात? तपास सुरू

मेरा बु. : गावातील मुख्य चौकातील बसस्टॉपजवळ असलेल्या विहिरीत ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने आत्महत्या की घातपात, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. अंढेरा पोलीस सूत्रांकडून व नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव…

Read More

दरोड्यातील ५ लाखांचा मुद्देमाल मालकांच्या ताब्यात; अंढेरा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

मेरा बु. : बायगाव बु. येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील सुमारे ५ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल अंढेरा पोलिसांनी शंभर टक्के हस्तगत करून न्यायालयाच्या आदेशानंतर मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द केला. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या हस्ते हा मुद्देमाल परत करण्यात आला. अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील बायगाव बु. येथे १८ मार्च रोजी रात्री अज्ञात…

Read More

सामाईक विहिरीच्या हिस्स्यावरून शेतात वाद; परस्परविरोधी तक्रारींवरून चौघांविरुद्ध गुन्हे

मेरा बु.:- शेतातील सामाईक विहिरीच्या हिस्स्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण होऊन शिवीगाळ, धक्काबुक्की आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना मेंडगाव शिवारात घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंदवून चौघांविरुद्ध कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेंडगाव येथील उषाबाई दत्तात्रय गीते आणि काशिनाथ…

Read More

२१ वर्षीय तरुणी रहस्यमयरीत्या बेपत्ता; अंढेरा पोलिसांकडून शोध सुरू

मेरा बु. :- तालुक्यातील रोहडा येथील २१ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध करूनही तिचा ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहडा येथील रहिवासी शेख इरफान शेख नजीर (वय २८) यांनी ८…

Read More

रस्त्याच्या हक्कावरून वाद चिघळला; घरासमोर येत दाम्पत्याला मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मेरा बु.:- अंढेरा गावात शेतातील जाण्या-येण्याच्या रस्त्याच्या हक्कावरून सुरू झालेला वाद चिघळत थेट घरासमोर येऊन मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगीता प्रल्हाद नागरे (वय ४५) या १२ एप्रिल रोजी घरी परतत असताना रामा प्रल्हाद केदार यांच्या शेतातून जात होत्या. यावेळी “या रस्त्याने येऊ…

Read More

अश्लील व्हिडिओची धमकी देत विवाहितेवर वारंवार अत्याचार आरोपीविरुद्ध बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

  मेरा बु. : अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका २५ वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तक्रारीनुसार, पीडित महिला मजुरीसाठी शेतात एकटी जात असताना आरोपीने तिचे…

Read More