Headlines

अंढेऱ्यात युवकाची आत्महत्या; पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा

अंढेरा : वैवाहिक वादातून मानसिक त्रास देऊन युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत अंढेरा पोलिसांनी पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. अंढेरा येथील सूरज रामभाऊ तेजनकर यांनी २३ जुलै रोजी नातेवाइकाच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृताची आई शशिकला तेजनकर यांच्या फिर्यादीवरून पत्नी वंदना सूरज तेजनकर…

Read More

मद्यधुंद दुचाकीस्वाराची पादचाऱ्याला धडक; गंभीर जखमी इसमाचा मृत्यू, अंढेरा येथील घटना!

अंढेरा : मद्यधुंद अवस्थेत भरधाव दुचाकी चालवणाऱ्या तरुणाने पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ५६ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २३ जून रोजी अंढेरा फाटा ते अंढेरा मार्गावर घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंढेरा येथील मधुकर सानप यांचा मुलगा पवन याची भारतीय सैन्यदलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. कर्तव्यावर…

Read More

शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार-स्टार्टर चोरीने चिंता वाढली, चिचखेड परिसरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; २८ हजारांचे साहित्य लंपास

  मेरा बु. : शेतीसाठी जीवापाड मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता नैसर्गिक संकटांसोबतच चोरट्यांच्या वाढत्या उपद्रवाचाही सामना करावा लागत आहे. चिचखेड शिवारात शेतातील विद्युत मोटार, स्टार्टर व वायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिचखेड…

Read More

बिअर शॉपी फोडून लाखोंचा माल लंपास; अज्ञातांविरुद्ध गुन्हा! अंढेरा परिसरातील घटना

अंढेरा :- परिसरातील मेरा बु. येथील बिअर शॉपीवर अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत सुमारे ४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निखिल पडघान यांच्या मालकीची मेरा बु ते फाटा रोडवरील बिअर शॉपी नेहमीप्रमाणे रात्री बंद करण्यात आली होती. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी…

Read More

दोन कुटुंबांत मारहाण, परस्पर तक्रारीवरून गुन्हे दाखल; अंढेरा येथील घटना!

अंढेरा :- अंढेरा येथे विवाहितेच्या आत्महत्येनंतर दोन कुटुंबांमध्ये तीव्र वाद होऊन हाणामारीची घटना घडली. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दिल्याने पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला अधिकच रंग चढला. माहितीनुसार, प्रभू चाटे व स्वाती डोंगरे यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. दोघेही मुंबईत वास्तव्यास होते. काही…

Read More

मुरूमाच्या वादातून महिलेस मारहाण; पाच जणांवर गुन्हा

मेरा बु. : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची घटना अंढेरा येथे १३ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंढेरा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाग्यश्री रामेश्वर केदार (वय २२) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या संगीता प्रल्हाद नागरे यांच्या कुटुंबीयांसोबत…

Read More

आमदाराचे नाव सांगत दादागिरी; आई-बहिणीसह तरुणाला मारहाण तीन आरोपींवर अॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

अंढेरा : राजकीय नेत्यांचे नाव सांगून सर्वसामान्यांवर दादागिरी करण्याचे प्रकार ग्रामीण भागात वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सुरा येथे एका तरुणाला त्याची आई व बहीण सोबत असताना मोटारसायकल आडवी लावून मारहाण केल्याची धक्कादायक घटना २ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध अंढेरा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंढेरा…

Read More

अल्पवयीन मुलगी बेपत्ता; जेसीबी ऑपरेटरवर संशय, गुन्हा दाखल

अंढेरा : – गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली असून, पोलिसांनी संशयित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात सोलर प्लांटचे काम सुरू आहे. या ठिकाणी जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करणारा मुकेश शामराव मंझा (रा. हरणी, ता. चिखली) हा संबंधित मुलीशी संपर्कात होता, अशी माहिती समोर…

Read More

आई-वडिलांच्या छत्राशिवाय वाढलेला चिमुकला काळाच्या पडद्याआड, खडकपूर्णा कालव्यात बुडून पाचवीतील विद्यार्थ्याचा हृदयद्रावक मृत्यू; आजीचा आक्रोश पाहून गाव सुन्न

अंढेरा :- आधीच आई-वडिलांचे छत्र हरवलेले आयुष्य… आजीच्या कुशीत वाढणारे बालपण… आणि सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत गेलेला निरागस जीव कायमचा निघून गेला. अंचरवाडी येथील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या स्वराज गणेश खरात या पाचवीतील विद्यार्थ्याचा खडकपूर्णा कालव्यात बुडून झालेला मृत्यू संपूर्ण परिसराला सुन्न करून गेला आहे. कलोरा येथील स्वराज हा लहान वयातच आई-वडिलांना मुकला होता. त्याचा सांभाळ त्याची…

Read More

अंढेरा परिसरात अवैध धंद्यांचा उघडपणे धुमाकूळ; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, कारवाईसाठी पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांचे निवेदन!

अंढेरा :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार वर्षांपासून अवैध दारू विक्री, मटका, वरली, हातभट्टी, आणि वाळू वाहतुकीसारखे गैरकृत्य उघडपणे सुरू असून, पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते कार्तिक खेडेकर आणि विठ्ठल खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला…

Read More
error: Content is protected !!