Headlines

विदर्भ लाईव्हच्या बातमीचा दणका! मलकापूर आगारात पाससाठी रांगेत उभ्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती सावली

मलकापूर : एसटी बस पास मिळविण्यासाठी रणरणत्या उन्हात तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांच्या गैरसोयीबाबत ‘विदर्भ लाईव्ह’ने आवाज उठविल्यानंतर मलकापूर आगार प्रशासनाला अखेर जाग आली आहे. पास वितरण केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना उन्हापासून दिलासा मिळावा, यासाठी आगार प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हात उभे राहून पास मिळविण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा…

Read More

मलकापूर, नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या प्रकरणी शिवसेना (उबाठा) आक्रमक; कार्यकारी अभियंता तायडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन

मलकापुर:- मलकापुर व नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या म.रा.वि.वि कंपनी संदर्भात विविध तक्रारी असून कंपनी शेतकऱ्यांच्या तक्रारी कडे कानाडोळा करीत असल्याने शेतकऱ्यांना विहिरीत पाणी उपलब्ध असून पिकांना देता येत नाही, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी नांदुरा व मलकापूर तालुक्यातील शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना सह संपर्कप्रमुख वसंतराव भोजने, शिवसेना…

Read More

मलकापूरमध्ये नातेवाईकांकडे गेलेल्या तरुणाला मारहाण; हतोड्याच्या वाराने जखमी; तीन जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

मलकापूर : नातेवाईकांकडे गेलेल्या तरुणाला तेथून निघून जाण्यास सांगत वाद घालण्यात आला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून, एका महिलेने हतोड्याने डोक्यावर वार केल्याने तरुण जखमी झाला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आकाश साहेबराव रावणचवरे (रा. बहापुरा, ता….

Read More

घरातून निघून का गेली नाहीस? म्हणत पत्नीवर चाकूने वार; बहिण व मेहुणाही जखमी, मलकापूरमध्ये एकाविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर : घरातील सामान घेऊन निघून का गेली नाहीस, असा जाब विचारत हातात चाकू घेऊन घरात घुसलेल्या पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना शहरातील सुभाषचंद्र बोस नगर परिसरात घडली. या हल्ल्यात पत्नीच्या छातीवर, बहिणीच्या हाताच्या बोटांवर आणि मेहुण्याच्या पोटावर चाकूने वार करून तिघांना जखमी करण्यात आल्याची तक्रार आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा…

Read More

रस्त्यावर पडलेल्या विद्युत तारांचा शेतकऱ्याला जबर धक्का; ४० वर्षीय सुभाष जाधव यांचा मृत्यू

संग्रामपूर : शेतात जाण्याच्या रोजच्या प्रवासात रस्त्यावर मृत्यू दबा धरून बसला असेल, याची कल्पनाही सावळा येथील शेतकरी सुभाष रामकृष्ण जाधव यांना नव्हती. झाडाची फांदी तुटून विद्युत तारांवर पडल्याने वीजप्रवाह सुरू असलेली तार रस्त्याच्या मधोमध पडली होती. याच तारेला दुचाकीवरून जाताना स्पर्श झाल्याने ४० वर्षीय सुभाष जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेले सारंगधर…

Read More

विहिरीवर मोटर सुरू करताना विजेचा धक्का; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

आसलगाव : घराजवळील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी मोटर सुरू करण्याचा प्रयत्न एका २७ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला. विद्युत बोर्डात वायर जोडत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे घडली. बादल जगदेव अंभोरे (वय २७, रा. पळशी सुपो) असे मृत…

Read More

मलकापूर आगाराचा भोंगळ कारभार? पासेस साठी रणरणत्या उन्हात विद्यार्थ्यांसह वयोवृद्धांची फरफट; मलकापूर आगार प्रमुखांनी धृतराष्ट्राचे सोंग घेतले आहे का?

मलकापूर : विद्यार्थ्यांच्या हातात शिक्षणाची स्वप्ने आणि एसटी पाससाठी हातात पैसे घेऊन मलकापूर आगारात येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना मात्र रणरणत्या उन्हात तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. मलकापूर आगारातील पास वितरण केंद्राबाहेरचे हे चित्र एसटी प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे लहान चिमुकले विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच वयोवृद्ध नागरिक…

Read More

भरधाव बसची दुचाकीला जोरदार धडक; ४४ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; शेगाव ग्रामीण पोलिसांकडून बसचालकाला अटक; न्यायालयीन कोठडी

खामगाव : खामगाव-शेगाव मार्गावर भरधाव खासगी बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री घडली. लासुरा शिवारातील अन्नकुटीजवळ झालेल्या या अपघातामुळे मार्गावर काही काळ खळबळ उडाली. अपघातानंतर शेगाव ग्रामीण पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण वासुदेव गाळे (२६, रा. खार तळेगाव, ता….

Read More

चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकची दुचाकीला धडक; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मेहकर येथील घटना

मेहकर : कामानिमित्त दुचाकीने मेहकरकडे निघालेल्या २३ वर्षीय तरुणाच्या प्रवासाचा देऊळगाव माळी फाट्यानजीक झालेल्या अपघाताने दुर्दैवी अंत झाला. चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सोमवारी (दि. १४) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. निशीन प्रकाश कापरे (वय २३, रा. देऊळगाव…

Read More

लावणा बसथांब्यावर अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश; कारसह १.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जानेफळ : पहाटेच्या सुमारास वाहनातून अवैध देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर जानेफळ पोलिसांनी कारवाई केली. लावणा येथील बसस्थानक परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत देशी दारूच्या २०० बाटल्यांसह कार व मोबाईल असा तब्बल १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केल्याने अवैध दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी…

Read More
error: Content is protected !!