संतांच्या प्रतिमेत बदल करून पोस्ट; मलकापूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

मलकापूर : संतांच्या छायाचित्रात कथित फेरफार करून त्यावर स्वतःचा चेहरा जोडलेले संपादित छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अमरावती येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
योगिता संदीप गावंडे (रा. धानोरा, ता. नांदुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. फिर्यादीनुसार, घनश्याम राजेंद्र ढोले (रा. अमरावती) यांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संतांच्या छायाचित्रात फेरफार करून त्यावर स्वतःचा चेहरा लावलेले संपादित छायाचित्र प्रसारित केल्याचा आरोप आहे.
या तक्रारीच्या आधारे मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २९९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!