Headlines

समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ पलटी; युवक ठार, आठ जण गंभीर जखमी

सिंदखेडराजा : समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा तालुक्यात भरधाव स्कॉर्पिओचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर वाहनातील अन्य आठ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, गंभीर जखमी अमन साहू याचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरच्या चॅनेलजवळ २३…

Read More

वैमानिक होण्याचे स्वप्न अधुरेच; २४ वर्षीय स्वप्निलचा उपचारादरम्यान मृत्यू

सिंदखेडराजा /वर्दडी बुद्रूक:- डोळ्यांत वैमानिक होण्याचे स्वप्न, त्यासाठी घेतलेले कठोर प्रशिक्षण आणि राज्यात मिळवलेले चौथे स्थान… आकाशात भरारी घेण्याची वेळ जवळ आली असतानाच एका भीषण रस्ता अपघाताने या स्वप्नाला ग्रहण लागले. अलिगड येथे प्रशिक्षणादरम्यान अपघातात गंभीर जखमी झालेल्या बुट्टा तांडा येथील २४ वर्षीय स्वप्निल उर्फ गोलू युवराज चव्हाण याचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला….

Read More

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डॉक्टर दाम्पत्य ठार, तिघे गंभीर

सिंदखेडराजा : समृद्धी महामार्गावरील आणखी एका भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची दोन मुले व चालक गंभीर जखमी झाले. मंगळवारी सकाळी किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फॉर्च्यूनर कारने चालत्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा हृदयद्रावक अपघात घडला. या अपघातात डॉ. सय्यद असिफ सय्यद उमर (५२) व त्यांच्या पत्नी…

Read More

साखरखेर्ड्यात गुटखा माफियांवर धडक; १८ लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त

सिंदखेडराजा : अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीविरोधात अखेर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई करत साखरखेर्डा येथे तब्बल १८ लाख ९ हजार ८१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठा साठा हस्तगत करण्यात आला असून कारवाईदरम्यान दोन्ही संशयित आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे. १७…

Read More

धांदरवाडीत मध्यरात्री घरफोड्या; दोन घरे व किराणा दुकान फोडून ऐवज लंपास!

सिंदखेडराजा : – तालुक्यातील धांदरवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरे आणि एका किराणा दुकानावर हात साफ करत सुमारे दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील कैलास केंधळे यांच्या घरी नुकताच लग्नसोहळा पार…

Read More

सिंदखेडराजा येथे बँकेसमोरून भरदिवसा मोटारसायकल डिक्कीतून अडीच लाखांची चोरी!

  सिंदखेडराजा: शहरातील भारतीय स्टेट बँक शाखेसमोर उभी असलेल्या मोटारसायकलची डिक्की फोडून अज्ञात चोरट्याने अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली. चिंचोली जहागीर (ता. सिंदखेडराजा) येथील शेतकरी अनिल राठोड हे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर आपल्या एम. एच. २८ एएम १३६१ क्रमांकाच्या मोटारसायकलजवळ उभे राहून नातेवाईकांशी संवाद साधत होते. त्याच दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोटारसायकलच्या…

Read More

झाडाची फांदी अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू, सिंदखेडराजा तालुक्यातील घटना!

सिंदखेडराजा :- तालुक्यातील वरदळी बुद्रुक. येथिल शेतकरी आंब्याची फांदी तोडत असतांना फांदी अंगावर पडल्याने पोटाला व छातीला हातापायाला मार लागल्याने सदर शेतकऱ्याचा जागीच दबुन मृत्यू झाल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. नामदेव गुलाबराव आटोळे वय ५० वर्ष असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून घरची परिस्थिती बेताची असल्याने सदर शेतकरी विनोद रावसाहेब काकडे यांची शेती…

Read More

चोरट्यांनी पोलीस चौकीसमोरील दोन दुकाने फोडली, दोन लाख चाळीस हजारांचे साहित्य लंपास! सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

सिंदखेडराजा :- तालुक्यातील दुसरबीड येथील महामार्गालगत असलेली दोन इलेक्ट्रिकल दुकाने फोडून चोरट्यांनी दोन लाख ४० हजारांचा ऐवज पळविला. सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री महामार्गावर असलेल्या जगदंबा मशिनरी या दुकानातून विद्युत पंप, पाईप, केबल असे एकूण दोन लाख रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी पळवून नेले. तसेच शेजारीच असलेल्या गुरुकृपा मोटर रिवायडींग या दुकानातून शेतकऱ्यांचे दुरुस्तीस आलेले विद्युत…

Read More

रुग्णालयाचा दरवाजा तोडून रोख रक्कम व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरी, सिंदखेडराजा तालुक्यातील घटना!

जांभोरा : सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील राहेरी ते शेवली मार्गावर असलेल्या डॉ. शरदचंद्र देशमुख यांच्या रुग्णालयाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी रोकड, सीसी कॅमेरे व इतर साहित्य लंपास केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. जांभोरा येथे राहेरी येथील डॉ. शरदचंद्र देशमुख यांच्या मालकीचे रुग्णालय आहे. अज्ञात चोरट्याने ३० सप्टेंबरला मध्यरात्री रुग्णालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत…

Read More

पाणी आणायला गेलेल्या 40 वर्षीय महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू!

दुसरबीड : सिं. राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा शिवारात एका ४० वर्षीय महिलेचा विहिरीत पाण्यात बुड्न मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गजानन भिकाजी उबाळे वय ५५ वर्षे, रा. मलकापूर पांग्रा, यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सौ. सुनीता सदानंद उबाळे वय ४० वर्षे ही महिला २३ ऑगस्ट, शुक्रवारी सायंकाळी ५…

Read More
error: Content is protected !!