विदर्भ लाईव्हच्या बातमीचा दणका! मलकापूर आगारात पाससाठी रांगेत उभ्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती सावली
मलकापूर : एसटी बस पास मिळविण्यासाठी रणरणत्या उन्हात तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांच्या गैरसोयीबाबत ‘विदर्भ लाईव्ह’ने आवाज उठविल्यानंतर मलकापूर आगार प्रशासनाला अखेर जाग आली आहे. पास वितरण केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना उन्हापासून दिलासा मिळावा, यासाठी आगार प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हात उभे राहून पास मिळविण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा…
