मलकापूर एसटी आगाराचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; मार्गफलकासाठी चालक-वाहकांच्या खिशाला कात्री! अधिकृत फलकांचा अभाव; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी चालक-वाहकच पुढे,मलकापूर आगार प्रमुख अजूनही झोपेतच ?
मलकापूर : दिवा तळाशी अंधार अशीच काहीशी अवस्था मलकापूर एसटी आगाराच्या कारभाराची झाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रवाशांना आपल्या गंतव्याची बस सहज ओळखता यावी, यासाठी आवश्यक असलेले अधिकृत मार्गफलक अनेक बसेसवर नसताना आता त्यावर आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून काही चालक आणि वाहक स्वतःच्या खिशातून चुना खरेदी करून बसवर…
