मंदिरातील किरकोळ वादातून तलवारीचा धाक; नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, बुलढाणा येथील घटना
बुलढाणा : देवीच्या आरतीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाने पुढे गंभीर स्वरूप धारण केल्याने बुलढाणा शहरातील कारंजा चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपचे नगरसेवक आकाश दळवी यांना तलवारीसह लोखंडी रॉड आणि बंदुकीसारखे शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नगरसेवकांच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान,…
