एआयच्या नव्या जगाची विद्यार्थ्यांना ओळख; स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये मार्गदर्शन कार्यशाळा
मलकापूर : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे भविष्यातील तंत्रज्ञान नसून आजच्या शिक्षण आणि करिअरचा महत्त्वाचा भाग बनत आहे. याच पार्श्वभूमीवर स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरील विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना एआयचे बदलते स्वरूप, त्याचे दैनंदिन जीवनातील उपयोजन तसेच भविष्यातील करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे…
