Headlines

कोलते कॉलेजच्या पार्किंगमधून ७० हजारांची बुलेट लंपास

मलकापूर : कोलते महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे ७० हजार रुपये किमतीची बुलेट अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मोताळा तालुक्यातील लिहा बु. येथील विद्यार्थी संस्कार ईश्वर पाटील (वय १८) हा ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कोलते महाविद्यालयात आला होता. त्याने त्याची जुनी वापरती बुलेट मोटारसायकल क्रमांक एमएच २८ बीएम १२२० ही कॉलेजच्या पार्किंगमध्ये उभी केली आणि तो वर्गात गेला.बदुपारी ४.३० वाजताच्या सुमारास वर्ग संपल्यानंतर संस्कार पाटील पार्किंगमध्ये आला असता त्याला बुलेट जागेवर दिसून आली नाही. त्याने कॉलेज परिसर तसेच आजूबाजूच्या ठिकाणी शोध घेतला. मात्र, बुलेटचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर त्याने याबाबत मलकापूर शहर पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अपक्र. ७३४/२०२६, कलम ३०३ (२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून बुलेटचा शोध घेण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!