Headlines

नागझरी रोडवर अज्ञात वाहनाची दुचाकिला धडक, दुचाकीस्वार ठार, शेगाव येथील घटना

शेगाव : नागझरी रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत ५४ वर्षीय दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुरलीधर आनंदा काठोळे (वय अंदाजे ५४, रा. गणेशनगर, माळीपुरा, शेगाव) असे मृतकाचे नाव असून, ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. मुरलीधर काठोळे हे १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजेदरम्यान मोटारसायकलने शेताकडे जात होते. नागझरी रोडवरील युवराज देशमुख यांच्या घरासमोरून जात असताना अज्ञात वाहन चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांच्या होंडा शाइन मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत काठोळे गंभीर जखमी झाले, तर त्यांच्या मोटारसायकलचेही नुकसान झाले. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर दुखापत झाल्याने काठोळे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचे मावसभाऊ सागर दिडोकार (वय ३५, रा. सावता चौक, माळीपुरा, शेगाव) यांच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा क्र. ६२४/२०२६ दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १०६(१), ३२४(२) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम १३४, १७७ अन्वये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा व चालकाचा शोध सुरू असून, पुढील तपास पोहेकॉ रवी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!