धाब्यावर जेवण करताना वाद पेटला; ६१ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
नांदुरा : राष्ट्रीय महामार्गावर धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या दोन परिचितांमध्ये किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ६१ वर्षीय व्यक्तीला चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. ही घटना २ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास वडनेर भोलजी येथील फिरोजभाई यांच्या धाब्यावर घडली….
