अंढेरा घाटात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

मेरा बु. : पुण्याहून हिवरखेडकडे दुचाकीने परतणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा अंढेरा घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर तरुण गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावला. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते २.३० वाजेदरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गणेश रामचवरे (वय २२, रा. हिवरखेड) हा एमएच ३० सीसी ०६९८ क्रमांकाच्या दुचाकीने पुणे येथून हिवरखेडकडे जात होता. अंढेरा घाटातून जात असताना अज्ञात वाहनचालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून संतोषच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात संतोष गंभीर जखमी झाला. मात्र, उपचाराची संधी मिळण्यापूर्वीच त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी फिर्यादी विशाल शेषराव काटोने यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ व २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन सांगळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!