Headlines

घरातून अचानक बेपत्ता झालेली १८ वर्षीय तरुणी; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय, अंढेरा पोलिसांत गुन्हा दाखल

मेरा बु. : कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता मध्यरात्री घरातून बाहेर पडलेली १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना डोड्रा येथे उघडकीस आली आहे. नातेवाईकांनी परिसरासह संभाव्य ठिकाणी शोध घेऊनही तरुणीचा थांगपत्ता लागला नाही. अखेर वडिलांनी अंढेरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तिला पळवून नेले असावे, या संशयावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
डोड्रा येथील मानसी रामेश्वर सपकाळ (वय १८ वर्षे ३ दिवस) ही तरुणी ५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे २ वाजेदरम्यान घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. सकाळी ती घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही. यानंतर तिचे वडील रामेश्वर शिवसिंग सपकाळ (वय ४९) यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी कायम अप. क्र. ३८६/२०२६, कलम १४०(३) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता मानसीची उंची अंदाजे ४ फूट ५ इंच असून रंग गोरा व बांधा सडपातळ आहे. बेपत्ता होताना तिने निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. तसेच पायात सॅडल होते. या वर्णनाची तरुणी कुठे आढळल्यास किंवा तिच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे, पोलीस कॉन्स्टेबल भरत पोफळे किंवा तपास अधिकारी एएसआय गणेश देढे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *