मलकापूर शहर पोलिसांची विशेष मोहीम; नियम मोडणाऱ्यांकडून ३ लाखांवर दंड वसूल
मलकापूर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतानाच अवैध धंदे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मलकापूर शहर पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात धडक कारवाई केली. विविध गुन्ह्यांमध्ये आरोपींवर कारवाई करण्यासोबतच वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत तब्बल ६२८ वाहनधारकांवर वाहतूक केसेस दाखल करून २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा दंडात्मक महसूल…
