पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; खामगावात कौटुंबिक वादातून थरारक प्रकार
खामगाव : कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शहरातील सुटाळा खुर्द परिसरात घडली असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किशोर काशीराम चोपडे (वय ४९, रा. सुटाळपुरा, खामगाव) यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पांडुरंग नारायण बोचरे, अजय पांडुरंग बोचरे, गोपाल…
