“नाल्या तुंबल्या, शहर दुर्गंधीत बुडाले; तक्रारींनंतरही मलकापूर नगरपालिका ‘कुंभकर्णी’ झोपेत!”

मलकापूर ( दिपक इटनारे ): “आगीत तेल ओतण्याचे काम” नेमके कसे असते, याचा प्रत्यय सध्या बुलढाणा रोड परिसरातील नागरिकांना येत आहे. एकीकडे नाल्या गच्च भरून सांडपाणी रस्त्यावर आणि दुकानांमध्ये शिरत असताना, दुसरीकडे नगरपालिका प्रशासन मात्र “डोळे असून आंधळे” झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तब्बल चार ते पाच दिवसांपूर्वी नागरिकांनी तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही…

Read More

रस्ता अरुंद, मध्येच पोल… नागरिकांचे हाल, प्रशासन मौन; मलकापूर बसस्थानकासमोरील हायमास्ट पोलमुळे वाहतुकीस अडथळा!

( उमेश ईटणारे ) मलकापूर :- शहरातील बुलढाणा रोडवर बसस्थानकासमोर उभारण्यात आलेला हायमास्ट लाईट पोल आता वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. आधीच अरुंद आणि शहरातील मुख्य मार्ग असलेल्या या रस्त्याच्या मधोमध पालिका प्रशासनाने बसवलेला हा पोल आता नागरिक आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनला आहे. सुमारे वर्षभरापूर्वी कोणतीही पूर्वतयारी किंवा वाहतुकीचा सखोल अभ्यास…

Read More

भरधाव ट्रकची थ्रेशरला भीषण धडक; २ ठार, ४ जखमी; तालसवाडा जवळची घटना

मलकापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर तालसवाडा नजीक पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव ट्रकने पाठीमागून थ्रेशर ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मौजे धरणगाव येथील मजूर थ्रेशरसह ट्रॅक्टर (क्र. एमएच २८ एझेड ३२५९) घेऊन मुक्ताईनगरकडे जात होते. दरम्यान,…

Read More

वळणावर भीषण अपघात; बुलेटस्वार युवकाचा मृत्यू, दोघे जखमी

चिखली : लग्नासाठी जात असलेल्या तिघा युवकांच्या बुलेटला वळणावर अपघात होऊन एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३० एप्रिल रोजी अंचरवाडी ते अंढेरा फाटा दरम्यान घडली. या अपघातात दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ओम संजय जामदार (वय २८), जय सुनील जामदार (वय २२) आणि अभिजीत प्रमोद भवर (वय २५, सर्व…

Read More

लग्न होत नसल्याने तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : आयुष्याच्या वळणावर उभ्या असताना लग्न जुळत नसल्याच्या मानसिक तणावातून एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याची हृदयद्रावक घटना मलकापूर तालुक्यातील माकनेर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केशव बाबुराव वनारे (वय २२ वर्ष, रा. माकनेर ता. मलकापूर) हा तरुण काही दिवसांपासून लग्न होत नसल्याच्या कारणामुळे मानसिक…

Read More
error: Content is protected !!