कमर्दीपुर शिवारातील लोंबकळत्या वीजतारांनी वाढवली धोक्याची घंटा; शिवसेना उबाठाकडून आंदोलनाचा इशारा
मलकापूर : – तालुक्यातील देवधाबा येथील कमर्दीपुर शिवारात शेतीजवळील वीजतारा धोकादायकरीत्या खाली लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. माहितीनुसार, कमर्दीपुर शिवारातील गट क्रमांक ४० व ४४ मधील दोन वीज खांबांमधील अंतर वाढल्याने खांब झुकले असून, विद्युत…
