Headlines

शाळेत गेलेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही; गावातील २५ वर्षीय तरुणावर अपहरणाचा संशय! पिंप्री गवळी येथील घटना

पिंप्री गवळी : शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने आव्हा गावात खळबळ उडाली आहे. बराच वेळ होऊनही मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, गावातीलच एका २५ वर्षीय तरुणासोबत मुलगी दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या आईने संबंधित तरुणाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मोताळा तालुक्यातील आव्हा येथील ही घटना असून, मुलीची आई यांनी ३१ ऑक्टोबर रोजी धामणगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. तक्रारीनुसार, मुलीचे वय १७ वर्षे ४ महिने २७ दिवस असून ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे आईने गावातील एका ओळखीच्या रिक्षाचालकाकडे चौकशी केली असता, त्याने मुलीला गावातील सहदेव चांगदेव घोंगटे (वय २५) याच्यासोबत बोलताना पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर मुलगी रिक्षातून घरी येण्यासाठी निघाली होती. मात्र, माळेगावजवळ महत्त्वाचे काम असल्याचे सांगून ती रिक्षातून उतरल्याची माहिती चालकाने दिली. यानंतर मुलीचे आई-वडील आणि गावच्या सरपंचांनी महाविद्यालयात जाऊन तिचा शोध घेतला; मात्र ती आढळून आली नाही. अखेर सहदेव चांगदेव घोंगटे यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत आईने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून संबंधित तरुणाविरुद्ध धामणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निखिल निर्मळ यांच्या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय जवरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *