Headlines

रोकडिया नगरात घरफोड्यांची मालिका; दोन घरांतून सोन्याचे दागिने व रोकड लंपास

शेगाव : शहरातील रोकडिया नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन बंद घरांना लक्ष्य करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन गणेश कराळे (वय ३३, रा. नागझरी, ह.मु. रोकडिया नगर) हे प्रसन्न सातव यांच्या घरी भाड्याने राहतात. ८ मे रोजी दुपारी १ वाजेपासून ते १० मे रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्याचे ओम, अंगठी, सोन्याचे मणी तसेच १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. दरम्यान, दुसऱ्या घटनेत विठ्ठल बाबाराव सदर (वय ५६, रा. मंगलम नगर, जुना चिंचोली रोड) हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे समोरील लॉक तोडले. घरातील लोखंडी कपाट फोडून सोन्याची अंगठी, कानातले व १५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.
या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(ए) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका निलेश गाडगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!