भरधाव चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

खामगाव :- खामगाव-शेगाव रोडवरील मंगल कार्यालयाजवळ गुरुवारी दुपारी सुमारे १ वाजताच्या दरम्यान दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २७ एम २४६२ क्रमांकाची दुचाकी आणि एचआर ५० सी ९०३३ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी चालक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. मृत व्यक्तीच्या खिशात “महेश राऊत” या नावाचे वाहन परवाना (लायसन) आढळून आले असून त्यावरून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!