Headlines

दिवाळीपूर्वी पुरवठा अधिकारी कार्यालयात पेंडिंग असलेल्या सर्व रेशन कार्डधारकांना त्वरित रेशन कार्ड देऊन धान्य पुरवठा करा अन्यथा “दिवाळीच्या दिवशी ठेचा भाकर खाओ” आंदोलनाचा शिवसेना(उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांचा इशारा

मलकापूर:- तालुक्यात सद्यस्थितीत दुष्काळ जन्य परिस्थिती असून तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी कार्यालयात बरेच रेशन कार्ड पेंडिंग असून पुरवठा विभागात उडवाउडवीची उत्तरे देऊन लाभार्थ्यांची दिशाभूल करून इष्टांक अभावी धान्यापासून वंचित ठेवले जात आहे. स्वस्त धान्य दुकानदारांचे रेशन कार्ड चालू होतात पण त्यांचा इष्टांग नसल्याने लाभार्थी धान्यापासून वंचित राहतात.तालुक्यात 81 स्वस्त धान्य दुकानदारांना इष्टांग वाढवून मिळत नसल्यामुळे प्रत्येक दुकानाचे 15 ते 20 कार्डधारक रेशन धान्यापासून वंचित राहत आहे. विविध शासकीय योजनांसाठी रेशन कार्ड ची आवश्यकता भासत असल्याने लाभार्थ्यांनी विभक्त रेशन कार्ड, शेतकरी लाभार्थी योजना बंद झाली असून त्या शेतकऱ्यांना शासनाकडून महाडिबीटी योजनेअंतर्गत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येतात असे सांगून दिशाभूल केली जात आहे.शेतकऱ्यांचे खात्यात अद्याप ही पैसे आले नाही,रेशन चे धान्य वितरित होत नाही अनेकांनी अर्ज केले आहे.मात्र ते पुरवठा अधिकारी कार्यालयात धूळ खात पडून असल्याची माहिती शेतकऱ्यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना दिली. मलकापूर तालुक्यात दुष्काळ परिस्थिती असून कोणीही लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये जिल्हा पुरवठा अधिकारी व तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी मलकापूर तालुक्यातील लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच पेंडिंग असलेले विभक्त रेशन कार्ड, बंद झालेल्या शेतकरी लाभार्थी योजना च्या रेशनकार्ड धारकांना दिवाळीपूर्वी रेशन चे धान्य वितरित करण्यात यावे अन्यथा शिवसेना (उबाठा) चे वतीने दिवाळीच्या दिवशी तहसील कार्यालयात “ठेचा भाकर खाओ” आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी तहसीलदार समाधान सोनवणे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *