Headlines

भरधाव बसची दुचाकीला जोरदार धडक; ४४ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; शेगाव ग्रामीण पोलिसांकडून बसचालकाला अटक; न्यायालयीन कोठडी

खामगाव : खामगाव-शेगाव मार्गावर भरधाव खासगी बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री घडली. लासुरा शिवारातील अन्नकुटीजवळ झालेल्या या अपघातामुळे मार्गावर काही काळ खळबळ उडाली. अपघातानंतर शेगाव ग्रामीण पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण वासुदेव गाळे (२६, रा. खार तळेगाव, ता….

Read More

शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी; आठ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे

खामगाव : तालुक्यातील लाखनवाडा येथील दोन गटांमध्ये शेतीच्या अतिक्रमणाच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी घारोड शेतशिवारात घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दिल्याने हिवरखेड पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दिलीप महादेव मासाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास शेतीच्या अतिक्रमणाच्या कारणावरून त्यांचा नातेवाइकांशी वाद झाला. यावेळी त्यांना…

Read More

माहेरहून पैसे आणण्याचा तगादा; विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासऱ्यावर गुन्हा

खामगाव : माहेरहून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पतीसह सासऱ्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव येथील गांधी ले-आऊट परिसरातील कल्याणी प्रशांत राव यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांचे पती प्रशांत विजयकुमार राव यांना दारू पिण्याची सवय असून ते दारूच्या नशेत फिर्यादीस…

Read More

चाकू हल्ल्याने खामगावात खळबळ; जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न

खामगाव : जुन्या वादाचा राग मनात धरून एका २९ वर्षीय तरुणाला हॉटेलसमोर बोलावून चाकूने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना खामगावातील भुसावळ चौक परिसरात घडली. चाकूचा वार अडविताना तरुणाच्या दोन्ही हातांसह कानाला दुखापत झाली असून, या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारत प्रकाश सोनी (वय २९) यांना…

Read More

मिलसमोरील रस्त्याकडेला रंगला जुगार; स्थानिक गुन्हे शाखेची धाड, सात जणांवर गुन्हा

खामगाव : एमआयडीसी परिसरातील राठी ऑईल मिलसमोरील रस्त्याच्या कडेला खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि ५२ ताशपत्ते असा एकूण ४५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सातही जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल…

Read More

खामगावात कौटुंबिक वादाचा दुर्दैवी अंत; बॅटने मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पती अटकेत

खामगाव : चारित्र्याच्या संशयातून पती-पत्नीमध्ये झालेला वाद टोकाला गेल्याने पतीने पत्नीवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोपाळ नगर घरकुल परिसरात ३० ऑगस्ट रोजी रात्री घडली. या मारहाणीत २६ वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला. घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी पतीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश महादेव डाबेराव (२६) आणि…

Read More

टाकळी तलाव परिसरात रात्रीचा वीजपुरवठा खंडित; शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त

खामगाव : तालुक्यातील टाकळी तलाव परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या १५ ते २० दिवसांपासून रात्रीच्या सिंगल फेज वीजपुरवठ्याच्या खंडिततेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतात वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही अडथळे निर्माण होत आहेत. टाकळी तलाव परिसरात अनेक शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात राहतात. मात्र रात्रीच्या वेळी वीज नसल्याने संपूर्ण परिसर अंधारात जात…

Read More

घराचा दरवाजा तोडताच समोर आला थरारक प्रकार; २५ वर्षीय युवकाची आत्महत्या

खामगाव : तालुक्यातील मांडका गावात एका २५ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना २८ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. घराचा दरवाजा वारंवार ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी दरवाजा तोडला असता युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. निखिल अभिमन्यू खंडारे (२५, रा. मांडका) असे मृत युवकाचे नाव आहे….

Read More

दूध घेऊन परतणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; दुचाकीस्वार भामट्यांचा यशोधरा नगरात धुमाकूळ

खामगाव : शहरातील यशोधरा नगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी दूध घेऊन घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तब्बल १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरवस्तीत सायंकाळच्या वेळेस घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, चोरट्यांनी अवघ्या काही क्षणांत सुमारे ७९ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा…

Read More

आदर्श नगरातील तीन दरवाजे तोडून घरात प्रवेश; पोलिसांच्या सायरनने चोरट्यांची धावपळ, सीसीटीव्हीत कैद

खामगाव : कुटुंबियांसह बाहेरगावी गेलेले घर हेरून चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य केले. मध्यरात्रीच्या सुमारास तीन चोरट्यांनी घराचे तब्बल तीन दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि घरातील साहित्याची फेकाफेक करीत चोरी केली. मात्र, अचानक पोलिसांच्या वाहनाचा सायरन ऐकू आल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. चोरीची ही घटना आदर्शनगर परिसरात उघडकीस आली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद…

Read More
error: Content is protected !!