लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याचा राग; शेजारी कुटुंबावर हल्ला

खामगाव : आवार येथे लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या कुटुंबावर काठीने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर नामदेव काळे (वय ५०, रा. आवार) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. आरोपी प्रकाश किसन टाले, धिरज प्रकाश टाले व रोशन प्रकाश…

Read More

हॉटेलसमोरून पल्सर दुचाकीची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

खामगाव : शहरातील अकोला रोडवरील मराठा हॉटेलसमोर उभी केलेली पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीष प्रल्हाद राऊत (वय ३४, रा. सुटाळा बु., ता. खामगाव) यांनी याबाबत तक्रार दिली….

Read More

बोरी शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; आठ जणांविरुद्ध गुन्हा

खामगाव : ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत ग्राम बोरी शिवारातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, ताशपत्ते असा एकूण ३ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव ग्रामीण पोलिसांना बोरी शिवार परिसरात काही व्यक्ती जुगार…

Read More

बैलाच्या धडकेत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू; बोरी अडगाव येथील दुर्दैवी घटना

खामगाव : – तालुक्यातील बोरी अडगाव येथे बैलगाडीला बैलजोडी जुंपत असताना बैलाच्या धडकेत ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम वामन टिकार (वय ७५) हे नेहमीप्रमाणे आपल्या बैलगाडीला बैलजोडी जुंपण्याचे काम करत होते. त्याचवेळी गावातील एक मोकाट गाय अचानक तेथे…

Read More

आजरपणाला कंटाळवून शाहरुख खानची आत्महत्या

खामगाव : अपघातानंतरच्या गंभीर दुखापतीमुळे उद्भवलेल्या शारीरिक त्रास, आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावाला कंटाळून ३२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यातील शिरजगाव देशमुख येथील जनतानगर परिसरात रविवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाचे नाव फारूख ऊर्फ शाहरूख खान युसूफ खान (वय ३२) असे आहे. तो…

Read More

जातिवाचक शिवीगाळ करत मजुरांवर जीवघेणा हल्ला; १२ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

खामगाव : तालुक्यातील गवळी रोड परिसरात मजुरांवर काठ्यांनी हल्ला करून जातिवाचक शिवीगाळ व धमकावल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात तिघेजण जखमी झाले असून, खामगाव ग्रामीण पोलिसांनी दोन नामनिर्देशित आरोपींसह १० ते १२ जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गवळी रोड परिसरात मजुरांवर हल्ला करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण…

Read More

गोमांस विक्रीवर पोलिसांचा धडक छापा; तिघे जेरबंद, फाटकपुरा, दालफैल आणि मस्तान चौक परिसरातील कारवाईत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगाव :- गोमांस विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी शहरातील फाटकपुरा, दालफैल आणि मस्तान चौक परिसरात धडक कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली. या कारवाईत कत्तल केलेले गोवंशाचे मांस, जिवंत गोवंश आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण १ लाख २४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित परिसरात…

Read More

कॅनमध्ये पेट्रोल नाकारल्याचा राग; तलवार-कोयता दाखवत पेट्रोल पंपावर दहशत

खामगाव : कॅनमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या चौघांनी पेट्रोल पंपावर तलवार व कोयता दाखवत दहशत माजविली. यावेळी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव-अकोला मार्गावरील के….

Read More

खामगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगाव:- शहरातील पुरवार गल्ली परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी धाडसी कारवाई करत सात जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पुरवार…

Read More

बंद घर फोडून चोरी; रोकडसह चांदीचे दागिने लंपास, खामगावातील तायडे कॉलनीतील घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव : शहरातील तायडे कॉलनी परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड व चांदीचे दागिने असा तब्बल ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरमालक कुटुंबासह बाहेरगावी गेल्याची संधी साधून ही चोरी करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाफीउर रेहमान अब्दुल रेहमान शेख (वय ७३), सेवानिवृत्त…

Read More
error: Content is protected !!