रानडुकराच्या हल्ल्यात दोन महिला जखमी, कोलोरी शिवारातील घटना; वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती
खामगाव : शेतात काम करीत असलेल्या दोन महिलांवर अचानक रानडुकराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजता तालुक्यातील कोलोरी शिवारात घडली. या हल्ल्यात दोन्ही महिला जखमी झाल्याने शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, यशोदा मारुती गुधदे (६५) आणि रंजना दुर्योधन सिरसाट (४८), दोघी रा. कोलोरी, या…
