खामगाव बसस्थानकात गर्दीचा फायदा; दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोथी लंपास
खामगाव : बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोथी लंपास केल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी खामगाव बसस्थानक परिसरात घडली. या घटनेत दोन्ही महिलांचे मिळून सुमारे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. पिंप्री गवळी येथील बेबीबाई गजानन सुलोकार (५३) या बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाची,…
