जुन्या वादातून तरुणाला दांड्याने मारहाण; चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी, मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील घटना!
मलकापूर : – मागील वादाच्या कारणावरून एका तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करून चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मलकापूर तालुक्यातील बेलाड येथे घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संघपाल मनोहर इंगळे (रा. बेलाड, ता. मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ मे रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या…
