Headlines

त्वचारोगांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी डॉ. गोंधणे रविवारी मलकापुरात

मलकापूर:- : त्वचा व सौंदर्य विकारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी असून महाराष्ट्रातील प्रख्यात त्वचारोग व सौंदर्य विकार तज्ज्ञ डॉ. टी. एस. गोंधणे हे रविवारी (दि. २४ मे) मलकापूर येथे रुग्णांची तपासणी व उपचारासाठी उपलब्ध राहणार आहेत.

त्वचेसंबंधित विविध आजारांवर अभिनव उपचारपद्धतीचा वापर करून रुग्णांना दिलासा देणारे डॉ. गोंधणे यांच्या भेटीमुळे परिसरातील नागरिकांना तज्ज्ञ सल्ला व उपचारांचा लाभ घेता येणार आहे. चेहऱ्यावरील मुरूम, काळे डाग, तीळ, चामखीळ, मस्से, नागीण, सोरायसीस, विविध प्रकारची खाज तसेच तळहात व तळपायांच्या भेगांसारख्या समस्यांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रविवारी मलकापूर येथील शांती आरोग्यं हॉस्पिटल, गणेश नगर, चाळीस बिघा, बसस्थानकाच्या पाठीमागे, निरामय हॉस्पिटलजवळ येथे रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. त्वचारोगांमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी 8446781238 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!