Headlines

शीर्वाद गेस्ट हाऊसमध्ये देहव्यापारावर पोलिसांचा छापा; ६ जणांविरुद्ध गुन्हा, शेगांवची घटना!

शेगाव : शहरातील इकबाल चौक परिसरातील आशीर्वाद गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या कथित अनैतिक देहव्यापाराच्या अड्ड्यावर शेगाव शहर पोलिसांनी सापळा रचून धाड टाकत कारवाई केली. या कारवाईत देहव्यापारासाठी जागा उपलब्ध करून देणे, ग्राहकांची व्यवस्था करणे व आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेल्या ६ जणांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील इकबाल चौक परिसरात सुरू असलेल्या कथित अनैतिक देहव्यापारावर शेगाव शहर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवार, २२ मे रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलिसांना आशीर्वाद गेस्ट हाऊसमध्ये महिलांचा अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपी हुसेन खान अजगर खान हा महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करून ग्राहकांकडून पैसे स्वीकारत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात गणेश साहेबराव खरात (रा. खामगाव), आदेश श्रावण काळे (रा. अमरावती), यश अशोक पैठणकर (रा. खामगाव) व गजानन आत्माराम निर्मळ (रा. खामगाव) हे ग्राहक म्हणून आढळून आले. तसेच आशीर्वाद गेस्ट हाऊसच्या मूळ मालकावरही देहव्यापारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी सनस्क्रीन जेल, क्रीम, कंडोम तसेच रोख रक्कम असा एकूण ४ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायम अपराध क्रमांक ३२६/२०२६ नुसार अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, १९५६ च्या कलम ३, ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मेहेत्रे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!