जलंब : राहत्या घरात गळफास घेऊन ३६ वर्षीय शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पहुरजिरा येथे उघडकीस आली. सुरेश महादेव बुंदे असे मृत शेतमजुराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश महादेव बुंदे (वय ३६, रा. पहुरजिरा, ता. शेगाव) हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविले. याप्रकरणी संजय महादेव बुंदे यांनी जलंब पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेश हिवाळे करीत आहेत.