माटरगाव खुर्द येथे ४० वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

जलंब : माटरगाव खुर्द येथे ४० वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जलंब पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माटरगाव खुर्द, ता. शेगाव येथील रहिवासी राजेंद्र गोपाल भड (वय ४०) यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये पंख्याजवळ असलेल्या लोखंडी कडीला सुती काळ्या-पांढऱ्या रंगाच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना १३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राजेंद्र भड यांनी आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत अनंता हरिभाऊ भड यांनी जलंब पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी मर्ग क्रमांक २२/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील देव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!