शेलोडी शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; १३ जणांवर गुन्हा, ८.४३ लाखांचा मुद्देमाल व रोकड जप्त; मध्यरात्री पोलिसांची कारवाई
खामगाव : शेतातील टिनशेडचा आधार घेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्याची माहिती मिळताच पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून १३ जणांना कारवाईच्या कचाट्यात आणले. शेलोडी शिवारात ६ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोकड व इतर साहित्य असा एकूण ८ लाख ४३ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने ही कारवाई केली….
