Headlines

शेलोडी शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; १३ जणांवर गुन्हा, ८.४३ लाखांचा मुद्देमाल व रोकड जप्त; मध्यरात्री पोलिसांची कारवाई

खामगाव : शेतातील टिनशेडचा आधार घेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्याची माहिती मिळताच पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून १३ जणांना कारवाईच्या कचाट्यात आणले. शेलोडी शिवारात ६ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोकड व इतर साहित्य असा एकूण ८ लाख ४३ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल योगेश कुवारे यांच्या फिर्यादीवरून १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संजय देवमन शेगोकार (५२, रा. कवठा, ता. बाळापूर), सुनील राजेंद्र भोजने (१९), शुभम दिलीप भोजने (२६), अमोल रमेश मुंडाले (२७) (तिघेही रा. तिंत्रव, ता. शेगाव), सचिन मधुकर मोहाडे (३०, रा. शेलोडी), प्रभाकर सुखदेव (रा. शेगाव), प्रभात आरे (५१, रा. शेलोडी), नासिर खान बशीर खान (४०, रा. शिवपुरा जामोद, ता. जळगाव जामोद), आकाश वसंता हांडे (३०, रा. लोनखेल जामोद, ता. जळगाव जामोद), निवृत्ती भगवान हिंगणे (३४, रा. तिंत्रव, ता. शेगाव), शेख राजीक शेख शफीक (४५, रा. आवार, ता. खामगाव), विनोद जनार्धन जाधव (४८, रा. शेलोडी) व राजू बघे (रा. पिंप्री गवळी) यांचा समावेश आहे. शेलोडी शिवारातील टिनशेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना आढळून आलेल्या संशयितांवर कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य तसेच रोख रक्कम असा ८ लाख ४३ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!