Headlines

२० किलोमीटर पाठलागानंतर गायचोरीचे वाहन पोलिसांच्या ताब्यातअंधाराचा फायदा घेत संशयित पसार

खामगाव : गाय चोरी करून कारमधून पळ काढणाऱ्या संशयितांचा पोलिसांनी तब्बल २० ते २५ किलोमीटर पाठलाग केला. अखेर बोरी अडगाव-वाडेगाव मार्गावर संशयित वाहन पोलिसांच्या हाती लागले; मात्र, कारमधील संशयितांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी कार जप्त केली असून, फरार संशयितांचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरी अडगाव परिसरातून गाय चोरी करून संशयित कारमधून वाडेगावच्या दिशेने भरधाव वेगाने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला. चालक कैलास हटकर तसेच सहायक पोलिस उपनिरीक्षक रिंढे यांनी संशयित वाहनाचा सुमारे २० ते २५ किलोमीटर पाठलाग केला. पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच संशयितांनी वाहनाचा वेग वाढवून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवत अखेर बोरी अडगाव-वाडेगाव मार्गावर संशयित वाहन अडवून ताब्यात घेतले. दरम्यान, वाहन थांबताच त्यातील संशयितांनी अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. पोलिसांनी वाहन जप्त केले असून, फरार संशयितांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!