Headlines

शौचालयासाठी गेलेल्या दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार; चिखली तालुक्यात खळबळ

चिखली : दिव्यांगत्वाचा गैरफायदा घेत २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बोरगाव वसु येथे उघडकीस आली आहे. ५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी चिखली पोलिसांनी सवणा येथील ३५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव वसु येथील स्मशानभूमीच्या पाठीमागे असलेल्या नाल्याजवळ पीडित तरुणी शौचासाठी गेली होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून तिच्या दिव्यांगत्वाचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पीडितेच्या ४० वर्षीय आईने चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सवणा येथील शेख रब्बानी शेख गणी (वय ३५) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(1), 64(2)(k), 78, अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यातील कलम 3(1)(w)(i), 3(1)(w)(ii), 3(2)(5), 3(2)(va) तसेच दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, 2016 मधील कलम 92(d) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!