देऊळगाव कुंडपाळ येथे गोशाळेत बिबट्याचा शिरकाव; गायीचा मृत्यू, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
देऊळगाव कुंडपाळ : – लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्प परिसरातील पांडुरंग गोसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या गोशाळेत २० फेब्रुवारीच्या मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून एका गायीचा बळी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. गोशाळेत सुमारे ७० गायी व दोन बैल बांधलेले होते. त्यापैकी पाच गायी दुभत्या असून वासरे शेजारील जागेत ठेवण्यात आली होती. रविवारी (दि. २१) सकाळी गोशाळेचे…
